Accident: संगमनेर: भरधाव कारच्या धडकेत आरोग्यसेवकाचा मृत्यू
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कोल्हार संगमनेर महामार्गावरील निमगावजाळी आरोग्य केंद्रासमोर बुधवारी दुपारी भरधाव कारच्या धडकेत (Accident) आश्वी आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकाचा मृत्यू झाला तर या केंद्रातील डॉक्टरसह इतर दोन आरोग्यसेवक जखमी झाले आहेत.
बुधवारी दुपारी घुलेवाडी आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला तालुक्यातील आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबीर संपल्यावर कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाले असताना निमगाव जाळी आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून चर्चा करीत रस्त्याच्या कडेला उभे होते.
यावेळी भरधाव वेगाने येत असताना अचानकपणे समोर आलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी वळालेल्या मारुती इर्तिका गाडीने याठिकाणी उभ्या असलेल्या आश्वी खुर्द आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर तसेच तीन आरोग्यसेवकासह तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकी उडवून दिल्या तर दगडी कठडे व लोखंडी फलक तोडून गाडी थेट शेतात गेली. यात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. जखमींमध्ये आश्वी खुर्द आरोग्य केंद्राचे डॉ. हेमंत जाधव तीन आरोग्यसेवक नरेंद्र पोटे, ज्ञानेश्वर ढाकणे यांचा समावेश आहे. उंबरी बाळापुर येथील रहिवासी असलेले कैलास भुसाळ यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
Web Title: Health worker killed in car crash Accident