Home संगमनेर संगमनेर: विवाहित तरुणीचा छळ; चौघांवर गुन्हा

संगमनेर: विवाहित तरुणीचा छळ; चौघांवर गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: 26 वर्षीय विवाहित तरुणीला लग्नात हुंडा दिला नाही, तुला मुलबाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू संमती दे असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार.

Harassment of a married girl Crime against four

संगमनेर: 26 वर्षीय विवाहित तरुणीला लग्नात हुंडा दिला नाही, तुला मुलबाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू संमती दे असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार कनकुरी (शिर्डी, ता. राहाता) येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सासरच्या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, घुलेवाडी (ता. संगमनेर) येथील सव्वीसवर्षीय तरुणीचा कनकुरी येथील यशोदीप बाबासाहेब शेटे याच्याशी सन 2022 मध्ये विवाह झालेला आहे. विवाहानंतर साधारण दीड महिन्यानंतर सासरी नांदत असताना सासरे बाबासाहेब बबनराव शेटे, सासू वृषाली बाबासाहेब शेटे व दीर श्रेयस बाबासाहेब शेटे हे तुझ्या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला नाही आणि आमचा मानपान व्यवस्थित केला नाही. तुला घरातील कामेही करता येत नाही म्हणून सतत शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

तसेच पती यशोदीप याने तुला मुलबाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू मला स्टॅम्प पेपरवर संमती दे असे म्हणून पीडित तरुणीला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातून काढून दिले. अखेर वैतागून संगमनेर शहर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडित विवाहित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या वरील चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सुजाता थोरात करत आहेत.

Web Title: Harassment of a married girl Crime against four

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here