अकोले तालुक्यात गारांचा ढीग, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Akole News: वादळ वार्यासह अवकाळी पावसाची (Rain) हजेरी, काही भागांत मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी चिंतातूर.
अकोले: अकोले शहरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी दुपारी वादळ वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. शेतात व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
अकोले तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काल शनिवारी दुपारी मुळा विभागातील चास, लिंगदेव, लहीत, वाशेरे या भागांत वादळ वार्यासह पाऊस पडला. प्रवरा पट्ट्यात अकोले शहरासह इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी, टाकळी, ढोकरी, गर्दनी, कुंभेफळ, कळस खुर्द व बुद्रुक, परखतपूर, राजूर या भागांत पावसाने हजेरी लावली. यातील इंदोरी-मेहेंदुरी परिसरात गारांचा ढीग साठल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तर आढळा विभागात सावरगाव पाट, समशेरपूर, टाहाकारी या गावांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळलाकाही क्षणातच रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी झाले होते. या जोरदार पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा, भाजीपाला या पिकाचेंही मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
Web Title: Hailstorm Rain in Akole taluka, extensive damage to crops
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App