Home संगमनेर संगमनेर: गुटका पकडला, दुचाकीहून गुटख्याची वाहतूक, पोलिसांची कारवाई

संगमनेर: गुटका पकडला, दुचाकीहून गुटख्याची वाहतूक, पोलिसांची कारवाई

Breaking News | Sangamner Crime: प्रतिबंधित हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखू तसेच या मालाची वाहतूक होत असलेली दुचाकी, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Gutka seized, transport of Gutka by two-wheeler, police action

संगमनेर : दुचाकीहून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखू तसेच या मालाची वाहतूक होत असलेली दुचाकी, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील ज्ञानेश्वर सोनवणे (वय २४), ऋषिकेश शिवाजी सोनवणे (वय २४, दोघे रा. वेल्हाळे) आणि विजय भागवत (रा. इंदिरानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे पाटील यांना दुचाकीहून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिसांच्या पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांचे पथक चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक केली. रस्त्यावर थांबले असता, एमएच १७- सीजे २५६७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबविले. त्यांना त्यांची नावे विचारली. तसेच दुचाकीवर गोण्या होत्या. त्याबाबत सुद्धा विचारणा केली. त्यांनी त्यात पानमसाला असल्याचे सांगितले. पोलिस हेडकॉन्स्टेबल एन. डी. शिंदे यांनी पंचनामा करून प्रतिबंधित मुद्देमाल आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

भागवत याच्याविरोधात गुन्हा-  प्रतिबंधित माल संगमनेरच्या इंदिरानगर येथील उपनगरातील विजय भागवत याच्याकडून विक्रीकरिता घेतल्याचे सुनील सोनवणे, ऋषिकेश सोनवणे यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे भागवत याच्याविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. तशी साक्ष नोंदविण्यात आली. भागवत हा पसार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुमणे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Gutka seized, transport of Gutka by two-wheeler, police action

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here