Home अहिल्यानगर गुंजाळवाडी ग्रामपंचायत: थोरात आणि विखे गटात संघर्ष, कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे...

गुंजाळवाडी ग्रामपंचायत: थोरात आणि विखे गटात संघर्ष, कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार

Ahmednagar | Gunjalwadi Grampanchayat Election: गुंजाळवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात याव्यात यासाठी आजी माजी महसूलमंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न. (sangamner News)

Gunjalwadi Grampanchayat Election Today

संगमनेर | अहमदनगर: जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी रविवारी, दि. 5 रोजी मतदान होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत. आज सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होवून उद्या सोमवार, दि.6 रोजी निकालाची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार हे स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पद तर काही ठिकाणी सरपंच पदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे 178 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 6 लाख 34 हजार 321 मतदार मतदान करतील. रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळात मतदान होईल. सोमवारी (दि. 6) मतमोजणी होईल. मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्र आहे. तालुकानिहाय मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोले 22, संगमनेर 6, कोपरगाव 17, श्रीरामपूर 13, राहता 12, राहुरी 21, नेवासे 16, नगर 6, पारनेर 7 पाथर्डी 14, शेवगाव 27, कर्जत 6, जामखेड 3 व श्रीगोंदा 9 असून निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुंजाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मोठी लढत होत आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात याव्यात यासाठी आजी माजी महसूलमंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. आज सकाळी साडे सात ते साडे पाच या दरम्यान मतदान होणार आहे. निवडणुकांचे घरोघरी जाऊन प्रचार चांगलाच रंगला आहे. सरपंच पद हे जनतेतून थेट निवडून येणार आहे. थोरात गटाकडून गुंजाळ अमोल (नरेंद्र) संभाजी तर विखे गटाकडून गुंजाळ रोहिदास रेवजी तसेच गुंजाळ योगेश बाळासाहेब यांच्यात थेट लढत होणार आहे. या ग्रामपंचायतीत एकूण ३७ सदस्यांचे भवितव्य आज मत पेटीत बंद होणार असून उद्या निकाल लागणार आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार हे स्पष्ट होणार आहे. तर निकालाच्या अपडेटसाठी पाहत रहा संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Gunjalwadi Grampanchayat Election Today

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here