Home राहाता आजी-माजी महसूलमंत्री थोरात- विखे यांच्यात रंगणार लढाई

आजी-माजी महसूलमंत्री थोरात- विखे यांच्यात रंगणार लढाई

Sangamner Gram Panchayat Election: गाव बाळासाहेब थोरातांचे, मतदारसंघ मात्र मंत्री विखेंचा, आजी-माजी महसूलमंत्री यांच्यात रंगणार लढाई.

Gram Panchayat Election battle will take place between Thorat and Vikhe

संगमनेर: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता थोरात यांच्या मूळगावी आणि विखे यांच्या मतदारसंघातील जोवें गावातील ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, ऐन थंडीत गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

संगमनेर तालुक्यात एकूण ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष जोर्वे गावाकडे लागले आहे. त्याला कारणही तसच आहे. जोर्वे हे गाव माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मूळ गाव असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहरता मतदारसंघात येत असल्याने आता आजी-माजी महसूलमंत्री यांच्यात पुन्हा एकदा राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

ग्रामपंचायत निवडणुकीत ७ सदस्य विखे गटाकडून तर ६ सदस्य थोरात गटाकडून निवडून आले होते. तर जनतेने थोरात गटाच्या उमेदवाराला सरपंच म्हणून निवडून दिले होते. थोड्याच दिवसात जनतेतून निवडून आलेले सरपंच विखे गटात आल्याने ग्रामपंचायतची सत्ता विखे गटाकडे होती. त्यामुळे आता पुन्हा थोरात विखे यांचा राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगणार असल्याचं चित्र दिसू लागले आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पूर्ण मैदानाशी ताकदीने निवडणूक रिंगणात उतरल्याने गेल्या पंचवार्षिकमध्ये जोर्वे राजकीय लढाई रंगणार आहे.

Web Title: Gram Panchayat Election battle will take place between Thorat and Vikhe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here