Home महाराष्ट्र Gold Prices Today: पितृपक्षातही सोने व चांदीचे भाव वाढले, असे आहे आजचे...

Gold Prices Today: पितृपक्षातही सोने व चांदीचे भाव वाढले, असे आहे आजचे दर

 

Gold Prices Today 16 Sep.जळगाव(Gold Prices Today): चालू आठवड्याभरात सोने व चांदीचे भाव वाढले आहेत. चांदीचे भाव दीड हजार रुपयाने वाढून ६६ हजार ५०० रु. प्रतिकिलो झाले आहेत तर सोन्याचे भाव ७७ रुपयांनी वाढले आहे. सध्याचे भाव ५२ हजार २०० रु. प्रति तोळा इतके झाले आहे.

मागील दोन महिन्यापासून सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत होती. मात्र एक महिन्यापासून घसरण झाली होती. आता मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा भाव वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात चांदीचे भाव ६५ हजार रुपयांवर होते. सध्या ते वाढले असून ६६ हजार ५०० रु. प्रतिकिलो झाले आहे. तसेच मागील आठवड्यात सोन्याचे भाव ५१ हजार ५०० रु. इतके होते. त्यात ७०० रुपयांनी वाढ होऊन ५२ हजार २०० रुपये प्रति तोळा इतके झाले आहे.

See also: Diablo Cody is co-writing that the untold true story

दरवर्षी पितृपक्षात सोन्या चांदीच्या मागणीत घट होऊन भावही घसरतात. मात्र ह्या वर्षी करोना पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारात पितृपक्षातही सोन्या चांदीचे भाव वाढले आहे. दलालांच्या हस्तक्षेपामुळे भाव अचानक कमी जास्त होत आहेत असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Gold Prices Today 16 Sep.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here