Home राष्ट्रीय गोध्रा रेल्वे जळीत कांड दोघांना  जन्मठेप , तिघे निर्दोष

गोध्रा रेल्वे जळीत कांड दोघांना  जन्मठेप , तिघे निर्दोष

गोध्रा रेल्वे जळीत कांड दोघांना  जन्मठेप , तिघे निर्दोष

 गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ रोजी झालेल्या गोध्रा रेल्वे जळीत कांडप्रकरणी येथील एका विशेष एसआयटी न्यायालयाने सोमवारी मालेगावच्या इम्रान अहमद भाटुक उर्फ शेरु याच्यासह २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेनंतर गुजरातमध्ये होरपळुन मृत्यु झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय दंगल उसळुन सुमारे  १ हजार जणांचा मृत्यु झाला होता.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

२७ फेब्रवारी २००२ रोजी गुजरातच्या गोध्रा रेल्वे  स्थानावर साबरमती एक्स्प्रेसचे २ डबे जाळण्यात आले होते. या घटनेत ५९ कारसेवकांचा होरपळुन मृत्यु झाला होता. याप्रकरणी विशेष न्यायाधिश एच.सी. व्होरा यांनी सोमवारी फारुख भाना व इमरान अहमद भाटुक उर्फ शेरु या दोघांना जन्मठेपची शिक्षा ठोठावली, तर हुसैन सुलेमान मोहन, कासम भामेडी व फारुख धानातिया यांची निर्दाष सुटका केली. सरकारी पक्षाला या प्रकरणात केवळ भाना व शेरु यांच्या वरील आरोप सिध्द करण्यात यश आले. या ५ आरोपींना २०१५-१६ मध्ये अटक करण्यात आली होती. मोहन याला मध्य प्रदेशच्या झाबुआतुन, तर भामेडीला गुजरातमधील दाहेद रेल्वे स्थानावरुन अटक करण्यात आली होती. धानतिया व भाना यांना गोध्रातील त्यांच्या घरातुन अटक करण्यात आली होती. भाटुक याला महाराष्ट्राच्या मालेगावातुन अटक करण्यात आले होती. या प्रकारणातील ८ आरोपी अद्याप फरारी आहेत. विशेष एसआयटी न्यायालयाने याआधी १ मार्च २०११ रोजी या प्रकरणी ३१ जणांना दोषी ठरवत ११ जणांच्या मृत्युदंड , तर २० जणांना जन्मठेपची शिक्षा ठोठवली होती. तदनंतर गुजरात उच्च न्यायालयाने ऑक्टोंबर २०१७ मध्ये २० आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्ताब करत ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपची बदलली होती.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here