Home अकोले गोधडी नात्यातील पदर टिकवून ठेवेल : कवि डॉ. कैलास दौंड

गोधडी नात्यातील पदर टिकवून ठेवेल : कवि डॉ. कैलास दौंड

गोधडी नात्यातील पदर टिकवून ठेवेल – कवि डॉ. कैलास दौंड.

सर्वोदय विद्या मंदिरात कविने शिकविली स्वतःची कविता.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -गोधडी हे केवळ पांघरून नाही, तर ते दारीद्रयाचे प्रतीक आहे. दुःखाने पोळलेल्या जगण्यावर मायेचा शिडकावा घालणारा स्पर्श, प्रेमाचा स्नेह आहे. आई- वडीलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. जागतीकीकरणाची कितीही वादळे आली तरी “गोधडी” हि नात्यातील पदर टिकवून ठेवेल. असे प्रतिपादन गोधडी कवीतेचे कवी जेष्ठ ग्रामीण साहीत्यीक डॉ. कैलास दौंड यांनी केले.
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यक्रमातील गोधडी हि कविता कवी दौंड यांनी स्वतःशिकविली.
उपक्रमशिल शिक्षक दिपक पाचपुते यांनी मुलांना अध्ययन निष्पतीची अनुभूती देण्यासाठी आई आणि आजी यांच्या हाताच्या बोटाला सुईने गोधडी शिवल्यामुळे बोटाला खड्डे पडेपर्यंत गोधडी शिवायच्या या अनुभवासाठी मुलांना छोटी गोधडी शिवायला सांगितली. यांच्या संकल्पनेतुन कवीच्या मनातील भाव, खोलवरील मुळ विचार अधिक चांगल्या प्रकारे सांगु शकतील या विचाराने प्रत्यक्ष कवींना विद्यालयात आमंत्रीत करण्यात आले. यावेळी स्वतःची कविता शिकवताना कवी दौंड बोलत होते.
या प्रसंगि अध्यक्षस्थानी मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष बी.के. बनकर होते. यावेळी राजेंद्र भाग्यवंत, प्राचार्य अंतुराम सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विदयार्थ्यांनी “नागली” ची भेट देऊन कवि दौंड यांचा सत्कार केला.
विदयालयातील ६४ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गोधड्या पाहून कविं दौंड यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या गोधडीची परीपूर्ती मुलांनी केल्याचा अभिप्राय त्यांनी दिला.
अध्यक्ष श्री.बनकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस जाहीर केले.
सुत्रसंचालन कविता वाळुंज यांनी केले. तर नानासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इयत्ता आठवीच्या विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले.
वाचा लेख – प्रेमाला अंत नाही, वर्षभर (रोजच) व्हेलेंटाईन. संपादकीय: अजित गुंजाळ 

Website Title: Godhadi poem dr kailas daund


संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here