Home अहिल्यानगर गोदावरी नदीला पूर, प्रवरा दुथडी

गोदावरी नदीला पूर, प्रवरा दुथडी

Breaking News: गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 43882 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.

Godavari river floods, Pravara is in a state of disarray

राहता: सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे. नांदुर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 43882 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीला छोटा पूर आला आहे. कमालपूर बंधारा पाण्याखाली गेला.

गेल्या तीन दिवसांपासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथा पावसाने झोडपून काढला, त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दारणा धरणाच्या पाणलोटात तीन अंकी पाऊस झाला. पाणलोटातील घोटीला 120 मिमी, इगतपुरीला 173 मिमी पावसाची नोंद झाली. भावली 149, वाकी 119, भाम 110 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 1.3 टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. दारणा धरणातून 13160 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

दारणा समूहातील भावलीतून 948 क्यूसेक, भाममधून 3252 क्यूसेक, वाकीतून 363 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी दारणा धरणात दाखल होत होते. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 6.2 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा समूहाच्या व्यतिरिक्त वालदेवीतून 1305 क्यूसेक, आळंदीतून 687 क्यूसेक, मुकणेतून 400 क्यूसेक, कडवातून 3620 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र अधूनमधून जोरदार आगमन होत होते. मागील दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली होती.

त्यामुळे गंगापूर धरणात 24 तासांत अर्धा टीएमसीहून अधिकचे पाणी दाखल झाले. गंगापूरमधून काल 6336 क्यूसेक विसर्ग सुरू होता. काल सकाळी सहा वाजता संपलेल्या मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील आंबोलीने 176 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 127 मिमी पावसाची नोंद झाली. गौतमी गोदावरीला 100 मिमी, गंगापूरला 36 मिमी, कश्यपीला 32 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. काल सकाळपर्यंत एकूण गंगापूर मधून 4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जायकवाडी 54.45 टक्के जायकवाडीमध्ये 42223 क्यूसेकने विसर्ग दाखल होत होता. काल सायंकाळी 6 वाजता या धरणातील उपयुक्त साठा 54.45 टक्के इतका झाला होता. म्हणजेच उपयुक्त साठा 41.75 टीएमसी इतका झाला. तर मृतसह एकूण साठा 67.82 टीएमसी इतका झाला.

Breaking News: Godavari river floods, Pravara is in a state of disarray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here