गोदावरी नदीला पूर, जिल्ह्यातील गोदावरी नदीचा हा पूल वाहतुकीसाठी बंद
Godavari river bridge in the Kopargaon: योग्य ती खबरदारी म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद.
कोपरगाव: कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी सेतू (लहान पूल) वाहतुकीसाठी अनिश्चित काळासाठी प्रशासनाने बंद करण्यात आला आहे. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. योग्य ती खबरदारी म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नदी- नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे. चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
सोमवारी (११ जुलै) दिवसभर मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस नाशिक शहरासह परिसरात सुरुच होता. यामुळे गोदावरीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून नदीत आलेले पावसाचे पाणी आणि गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदामाई ओसंडून वाहू लागली आहे.
Web Title: Godavari river bridge in the Kopargaon is closed for traffic