Home क्राईम बाहेरगावी कामाला चल, तिचा नकार; सासूसमोरच पत्नीची कोयत्याने वार करत हत्या

बाहेरगावी कामाला चल, तिचा नकार; सासूसमोरच पत्नीची कोयत्याने वार करत हत्या

Nashik Crime News: बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने वाद होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्याने वार करत हत्या, धक्कादायक घटनेने खळबळ उडाली.

Go to work outside the village, her refusal Murder wife by stabbing

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने वाद होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की,  बागलाण तालुक्यात असलेल्या कऱ्हे येथील ललिता म्हाळू गांगुर्डे (वय २२) ही तिच्या आईकडे आली होती. ललिता आई गीता राजेंद्र पगारे (रा. देवळाने) हिच्या सोबत शेतमजुरी करून घराकडे येत असताना पती म्हाळू गोरख गांगुर्डे (वय २३, रा.शनी मंदिर सटाणा ह.मु.कऱ्हे) याने तिला रस्त्यात अडवून माझ्यासोबत बाहेरगावी कामास का येत नाही? अशी विचारणा केली आणि सोबत येण्याचा आग्रह धरला. परंतु ललिताने बाहेरगावी कामाला येण्यास नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन म्हाळू गांगुर्डे याने हातात असलेल्या कोयत्याने पत्नी ललिताच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर सपासप वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली

हल्ला केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या घटनेत पत्नी ललिता हिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती म्हाळू हा तिथून फरार झाला. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मयताचा मृतदेह नामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले. पोलिसांना आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याचे समजले त्यानंतर सापळा रचून शेतातून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Go to work outside the village, her refusal Murder wife by stabbing

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here