Home अहमदनगर तुला पैकीच्या पैकी मार्क देतो, पण तू मला काय देणार?  शिक्षकाचे मुलीशी...

तुला पैकीच्या पैकी मार्क देतो, पण तू मला काय देणार?  शिक्षकाचे मुलीशी चाळे

Breaking News | Ahmednagar:  नगरमधील धक्कादायक घटना: शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करत विनयभंग.

give you a mark, but what will you give me Teacher flirts with girl Molestation

अहमदनगर : तुला बारावीच्या प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क देतो, पण तू मला काय देणार? असे म्हणत कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश शिर्के (पूर्ण नाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गाला भूगोल विषय शिकवतो. सोमवारी या शिक्षकाने बारावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतले व तुला भूगोल विषयाच्या प्रॅक्टिकलसाठी तुला २० पैकी २० पैकी मार्क दिल्यास तू त्या बदल्यात मला काय देशील?, असे म्हणाला होता. गुरुवारी भूगोल विषयाचे प्रॅक्टिकल झाले. त्यात मुलीला शून्य गुण मिळाले. त्यामुळे केबिनमध्ये जाऊन जाब विचारला. त्यावेळी त्याने चाळे करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

Web Title: give you a mark, but what will you give me? Teacher flirts with girl Molestation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here