Home अहिल्यानगर हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्याः राधाकृष्ण विखे पाटील; ‘ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी...

हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्याः राधाकृष्ण विखे पाटील; ‘ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी दाखवावी’

Breaking News |Ahilyanagar: नाशिक हॅनी ट्रपची सीडी तिकीट लावून दाखवू म्हणणा-यांनी आपले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांकडे का दिले नाहीत. उबाठाचे खासदार संजय राऊत हे संशय निर्माण करतात. त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यायला हवे.

Give evidence of honey trap first Radhakrishna Vikhe Patil

शिर्डी: नाशिक हॅनी ट्रपची सीडी तिकीट लावून दाखवू म्हणणा-यांनी आपले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांकडे का दिले नाहीत. उबाठाचे खासदार संजय राऊत हे संशय निर्माण करतात. त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यायला हवे. प्रफुल्ल लोढा नामक जो कोणी म्हणतो की मी बटन दाबताच देशात खळबळ माजेल. त्याने खुशाल बटन दाबायला हवे, अशा शब्दांत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणा बाबत आपली प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले की हे प्रकरण हनी ट्रपचे नाही. कुणी माझ्याकडे तसे पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी सभागृहात ही विधाने केली आहेत. गृहमंत्रालयाकडून या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. कोण त्या हॉटेलातील ट्रॅपमध्ये गेले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कुणाला ब्लॅकमेलिंग केले जात असेल, तर त्याचे समर्थन करण्याचे कारण नाही. हा प्रकार भूषणावह नाही. चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील. दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. टीका आणि आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. मात्र विरोधकांनी पुरावे द्यायला हवेत. उगाच संशयाचा भोवरा कशाला. तिकीट लावून ज्यांना व्हिडिओ दाखवायचाय त्यांनी दाखवा खुशाल. आधी पुरावे तर द्या.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी या प्रकरणात भाजपचे दोन मंत्री आहेत. त्यात एक अहिल्यानगरचे भाजपचे मंत्री देखील आहेत, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, विनाकारण संशयाचे वातावरण निर्माण करून लोकांना त्यात अडकावयाचे. त्यांनी गृहमंत्रालयाकडे पुरावे द्यावेत. लोढा यानेही बटन दाबावे. छावाचे पदाधिकारी सुरेश चव्हाण यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. खासदार सुनील तटकरे यांनी या घटनेचा निषेध केला. हल्लेखोरावर कारवाई देखील झाली.

Breaking News: Give evidence of honey trap first Radhakrishna Vikhe Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here