अहिल्यानगर: प्रेयसीची हत्या, तरुणीचे शिर धडावेगळे करून प्रियकर पोलिसांत हजर
Breaking News | Ahilyanagar Crime: 28 वर्षीय प्रेयसीला 53 वर्षीय प्रियकराने लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले.
राहुरी: नाजुक संबंधातील वाद विकोपाला जाऊन ‘तू मला नाही सांभाळले तर तुला सोडणार नाही. तुझ्या विरुध्द गुन्हा दाखल करेल’ अशी धमकी देणार्या 28 वर्षीय प्रेयसीला 53 वर्षीय प्रियकराने लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
या घटनेतील पोखरी ता. आंबेगांव, जि. पुणे येेथील तरुणीचा पती सात वर्षे तुरूगांत असल्यामुळे सखाराम धोंडीबा वालकोळी (वय 53) रा. निरगुडसर, ता. आंबेगांव, जि. पुणे याच्याशी तिचेे सूत जुळले होते. ते दोघेजण काही काळ पती-पत्नी सारखे राहत होते. काही दिवसांपूर्वी तिचा पती तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती. त्यानंतर तिने पुन्हा सखाराम याला फोन करुन सांगितले की, ‘मला तूझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्यासोबत गेले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तू मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही. तुझ्याविरुध्द गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देऊ लागली. त्यामुळे सखाराम तिच्या धमकीला वैतागला होता. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास ही विवाहित तरुणी तिचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथुन अहिल्यानगर येथे आली. अहिल्यानगर बसस्थानकावर दोघांची भेट झाली. त्यानंतर सखाराम तिला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीरा शेजारच्या डोंगराजवळ आला. सायंकाळी 7.30 वाजे दरम्यान त्या दोघांनी तेथे बसून गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. आणि सखारामने तिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने वार करून तिचे शिर धडापासून वेगळे करून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः वांबोरी येथील पोलिस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार वाल्मीक पारधी, सुनिल निकम, आजिनाथ पालवे, अंकुश भोसले आदी पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि मयत तरुणीचे धड व धडापासुन वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. राहुरी पोलिस पथकाकडून आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सुनिल निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सखाराम धोंडीबा वालकोळी याच्यावर गु.र.नं. 134/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करीत आहे.
Web Title: Girlfriend’s murder, young girl’s head beheaded, lover