Home क्राईम महाराष्ट्र हादरला! प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर सामुहिक बलात्कार

महाराष्ट्र हादरला! प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर सामुहिक बलात्कार

Gang Rape Case: प्रियकराला झाडाला बांधून त्याच्या प्रेयसीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे.

Girlfriend gang rape in front of boyfriend by tying him to a tree

पालघर: पालघरमध्ये संतापजनक घटना समोर आली  आहे. प्रियकराला झाडाला बांधून त्याच्या प्रेयसीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींचं वय 22 आणि 25 वर्ष आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपींना अटक करुन स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी विरारच्या साईनाथ नगरमधील निवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह जवळच्या डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. आरोपींनी त्यांना पाहिलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी आणि तरुणामध्ये वाद झाला. तरुणाने बिअरच्या मोकळ्या बाटलीने दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर आरोपींनी तरुणाचेही कपडे फाडले आणि त्याला झाडाला बांधलं असं पोलिसांनी सांगितलं.

यानंतर आरोपींनी तरुणीला ओढत एका निर्जनस्थळी नेलं आणि बलात्कार केला. आरोपींनी यावेळी पीडित तरुणीची पर्स जाळून टाकली असं पोलिसांनी सांगितलं. पीडित तरुणीने आरोपींच्या तावडीतून पळ काढत घर गाठलं होतं. तर तरुण मात्र झाडाला बांधलेल्या अवस्थेतच होता. तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाची सुटका केली.

Web Title: Girlfriend gang rape in front of boyfriend by tying him to a tree

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here