प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने तिच्या बहिणीवर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटना!
Breaking News | Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना.
पुणे: पुणे शहराला हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गंज पेठेत घडली. रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरून गेले असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी ऋषी बागुल हा त्याच्या मित्रासोबत रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी आला होता. यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याची झाली आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. ऋषी बागुल याच्या प्रेयसीने त्याच्याशी संपर्क कमी करुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याला राग आला. तसेच ती न भेटल्यामुळे त्याचा राग अनावर झाला.
याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने त्याच्याकडील पिस्टल प्रेयसीच्या बहिणीवर रोखून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही” अशी धमकीही त्याने यावेळी दिली, तसेच त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून दोघेही निघुन गेले.
या गोळीबारात फिर्यादी यांची दुसरी बहीण किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर खडक पोलीस ठाण्यात ऋषी बागुल आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Web Title: Girlfriend breaks off contact, boyfriend shoots her sister
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study