मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार
Breaking News | Pune Crime: बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार उघडकीस (Gang Rape).
पुणे: पुण्यात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही
बोपदेव घाटामध्ये सातत्याने लूटमारीच्या घटना घडत असतात. मात्र आता तेथे एका तरूणीवरती तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला तिच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, पीडित तरूणी 21 वर्षांची असून ती फिरायला मित्रासोबत बोपदेव घाटात गेली होती. मात्र तेवढ्यात तिथे तीन अनोळखी लोक आले आणि त्यांनी मित्राला मारहाण करून त्याला डांबून ठेवलं. त्यानंतर त्या तिघांनी पीडित तरूणीवर सामूहिक अत्याचार केला.
पीडित मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून पाच क्राईम टीम नेमण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप:
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
Web Title: girl who went for a walk with a friend was gang-raped
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study