दहावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला फूस लावून पळविले
Breaking News | Ahmednagar: दहावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले.
अहमदनगर: दहावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात मंगळवारी (दि.२६) दुपारी घडली आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेतकरी असून, ते नगर-सोलापूर महामार्गावरील एका गावात राहतात. त्यांना तीन मुली असून, सर्वात मोठी मुलगी १६ वर्षे २ महिने वयाची असून, तिने यावर्षी दहावीचे पेपर दिले आहेत.
मंगळवारी (दि.२६) तिचा शेवटचा पेपर असल्याने ती महाविद्यालयात गेली होती. दुपारी पेपर सुटल्यावर तिला आणायला तिची छोटी बहीण गेली. मात्र, ती दिसून न आल्याने छोट्या बहिणीने वडिलांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी व कुटुंबियांनी पोलिस
मुलीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता काहीही माहिती मिळाली नाही. ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी पळवून त्यांच्या लक्षात आले.
नेल्याचे या पूर्वी रामदास राजेंद्र शिंदे रा.घोटवी, ता. श्रीगोंदा) याने मुलीला ( लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यावेळी त्याने मी तुमच्या मुलीला पळवून नेईल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे रामदास शिंदे यानेच आपल्या मुलीला पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी रामदास राजेंद्र शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: girl who was going to give the final paper of class 10 was seduced and abducted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study