Rape Case: धक्कादायक! गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार
Rape Case: घाटकोपरमध्ये एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रकरण उघडकीस आले आहे.
मुंबई: बलात्काराच्या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, तिघांचीही रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, तिघांनीही बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून पीडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी घाटकोपर परिसरात राहते. ही तरुणी गतिमंद असून ती शौचासाठी गेली होती. त्यावेळी तिघांनीही तिला जबरदस्तीने शौचालयाच्या आतमध्ये नेलं आहे. एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तर दुसऱ्या आरोपीने व्हिडीओ शूट केला आणि त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला. काही दिवसांनी हाच व्हिडीओ पीडितेच्या भावाने पाहिला आणि आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना याबाबतमाहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादंविच्या कलम 376, 376 (जे) (एल), 323, 500, 34 आणि पोक्सो कलम 4 आणि कलम 66 (ई) 67 (बी) अन्वये गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्यानं तिघांचीही रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: a girl who is in a hurry is rape by three people
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App