आधाराश्रम संचालकानेच केला मुलीवर बलात्कार
Rape Case: संचालकानेच केला मुलीवर बलात्कार, अन्य मुलींसोबत बळजबरीचा संशय.
नाशिक : म्हसरूळ शिवारातील कथित आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी हर्षल बाळकृष्ण मोरे (रा. सटाणा) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अन्य मुलींसोबतही त्याने बळजबरी केल्याचा संशय आहे.
म्हसरूळ शिवारात द किंग फाउंडेशन संस्थेकडून चालविल्या जाणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पीडिता ही जिल्ह्यातील एका आदिवासी तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. हर्षल याने पीडितेचा हात पकडून
तिला बळजबरीने पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत नेले आणि हातपाय दाबायला लावले. त्याच वेळी अश्लील व्हिडीओ दाखवून बळजबरी केली. पीडितेने विरोध केला असता तिला होस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेत तिची रात्री फिर्याद दाखल करून घेत संशयित हर्षल यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (अॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: girl was rape by the director of the Aadhaar Ashram
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App