सोशलवरून ओळख झाली अन् तरुणी पुण्यातून नगरमध्ये आली अन..
Breaking News | Ahlilyanagar: पुण्याचे पथक नगरमध्ये : मुलीसह मुलगाही ताब्यात.
अहिल्यानगर : पुण्यातील एका मुलीची सोशल मीडियावरून अहिल्यानगरमधील तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ही मुलगी मित्राला भेटण्यासाठी रविवारी अहिल्यानगरमध्ये आली. तिकडे मुलीच्या आईने पुणे पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांचे पथक सोमवारी सायंकाळी नगरमध्ये दाखल झाले. पथकाने दिवसभर शोध घेऊन मुलीला ताब्यात घेतले. यामुळे प्रकरणावर पडदा पडला.
पुण्यातील बारावीत शिकत असलेली मुलीची सोशल मीडियावरून अहिल्यानगर शहरातील तरुणाची ओळख झाली. ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. मुलाने मुलीला भेटण्यासाठी अहिल्यानगरला बोलविले. ही मुलगी रविवारी अहिल्यानगरला आली. दोन दिवसांपासून एकमेकांच्या सोबत होते. दरम्यान, मुलीच्या आईने पुणे पोलिसांत तक्रार दिली. तिकडे मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात ठाण मांडले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. मुलगी अहिल्यानगरमध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारी अहिल्यानगर शहरात दाखल झाले. त्यांनी शहरात मुलीचा शोध घेतला. ती मिळून आली. मुलीसह पोलिसांनी मुलालाही ताब्यात घेतले. दोघांना तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी करून पोलिसांचे पथक मुलीला घेऊन पुण्याला रवाना झाले.
Breaking News: girl was introduced through social media and came to the city from Pune