धक्कादायक! आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा संस्थाचालकाकडून विनयभंग
Breaking News | Nashik Crime: आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार.
नाशिक : मुखेड (ता. निफाड) येथील सुरूची आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात विनयभंग व पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष दिनेश चौधरी, असे संशयित संस्थाचालकाचे नाव आहे.
मुखेडच्या आश्रमशाळेत मागील वर्षी इयत्ता अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहात सुभाष चौधरी गेला. मुलीचे कपाट तपासणीचा बहाणा करू लागला. काही मुलींशी लज्जास्पद वर्तन केले, तर एका विद्यार्थिनीच्या विनयभंग केला. ‘रात्री नऊला माझ्या खोली दोनमध्ये ये’, ‘आपण गप्पागोष्टी करू’, असे त्या मुलीला सांगितले.
याबाबत कुणाला काही सांगितले, तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी चौधरीने संबंधित विद्यार्थिनीला दिली. हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने प्राचार्य चंद्रकांत आहेर, मुख्याध्यापक नंदकुमार पगार, अधीक्षिका पाटील, शिक्षिका वाघ, जाधव यांच्यापुढे कथन केला. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: girl student was molested by the director in the ashram school
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study