Home संगमनेर संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी

Breaking News | Sangamner: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना.

Girl seriously injured in leopard attack

संगमनेर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी संजय काळे (वय १९) ही (दि. १८) जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आई-वडिलांसोबत दुचाकीवरून घुलेवाडी फाट्याकडे जात होती. तेव्हा घुलेवाडी परिसरातील म्हसोबा मंदिर जवळ रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने संतोषी काळे हिच्या घुलेवाडी परिसरातील घटना डाव्या पायाच्या पोटरीला चावा घेत जखमी केले. स्थानिक नागरीकांनी जखमी मुलीला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती घटनेची माहिती समजताच वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

Web Title: Girl seriously injured in leopard attack

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here