अहिल्यानगर: मुलीला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार, मारहाण
Breaking News | Ahilyanagar Crime: एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवून लग्न केले, तसेच दारू पिऊन मुलीला मारहाण.
अहिल्यानगर : माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवून लग्न केले, तसेच दारू पिऊन मुलीला मारहाण केली. या प्रकरणी पाथर्डीतील तरुणाविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्या आई-वडिलांवर बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून शारीरिक संबंध ठेवले, तसेच आई-वडिलांच्या मदतीने ७ सप्टेंबर २०२२ रोजी पीडितेशी लग्न केले. लग्न झाल्यापासून १५ एप्रिल २०२५ पर्यंत विविध ठिकाणी मुलीवर अत्याचार केले, तसेच आरोपीने मुलीला दारू पिऊन मारहाण केली. यानंतर फिर्यादी मुलगी माहेरी निघून गेल्यानंतर आरोपीने तिथे जाऊन शिवीगाळ केली. या प्रकरणात पती, सासू, सासरे यांच्याविरोधात १९ जुलै रोजी कोतवालीत गुन्हा दाखल केला. फिर्यादीचे वय १६ वर्ष असल्याने बालगृहात ठेवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, कृष्णकुमार सेदवाड यांनी बालगृहात भेट घेऊन मुलीची चौकशी केली. घटना पाथर्डी तालुक्यात घडली असल्याने, गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.
Breaking News: Girl kidnapped, abused, beaten