Home संगमनेर संगमनेर: गॅस सिलिंडरचा स्फोट, घराचे उडाले पत्रे

संगमनेर: गॅस सिलिंडरचा स्फोट, घराचे उडाले पत्रे

Breaking News | Sangamner: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

Gas cylinder explosion, leaves of house blown up

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील राममळा वस्तीवर घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे पत्रे उडाले, भिंतींना तडे गेले आहेत. संसारोपयोगी साहित्यांचे, तसेच इतरही वस्तूंचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. ३) सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, धांदरफळ खुर्द येथील वेणूबाई पंढरीनाथ खताळ त्यांची नात छाया नेहे, नातू प्रवीण नेहे हे राहत आहेत याठिकाणी घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घरातील गॅस सिलिंडर संपल्यामुळे वेणूबाई खताळ यांनी नातू प्रवीण नेहे याला सिलिंडर आणण्यास सांगितले. नवे आणलेले सिलिंडर जोडल्यानंतर काही वेळाने गॅस सुरू केला. यावेळी रेग्युलेटरजवळ बारीक जाळ येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जाळ जास्त होत असल्याने घरातील सर्वच बाहेर पळाले आणि स्फोट झाला.

नेमकी काय घडलं:  जाळ पाहिल्यानंतर तातडीने रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत जाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्याने जात असलेल्या नीलेश खताळ व अजित खताळ या युवकांनी बारदाना पोते पाण्यात ओले करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. गॅस गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सिलिंडरने पेट घेतला.त्यामुळे सर्वजण घराबाहेर पळाले. त्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि घरातील सर्व सामान बाहेर फेकले गेले. संबंधित गॅस सिलिंडर असलेल्या कंपनीचे वितरक, तलाठी हे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला आहे. या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Gas cylinder explosion, leaves of house blown up

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here