गरबा किंग दांडिया खेळताना जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
Pune Breaking News: पुण्यात चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.
पुणे : सर्वत्र गरबा खेळण्याची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यात चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यात प्रसिद्ध गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. लेकासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. अपस्थितांनी त्याला तात्काळ उचलून रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत सारं संपलेलं होतं. डॉक्टरांनी या तरुणाला तपासून मृत घोषित केले.
संबंधित घटनेचा व्हिडीओ मनाला चटका लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये अशोक माळी घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी… या गाण्यावर आनंदाने आपल्या लेकासोबत गरबा खेळत होते. गरबा खेळताना अचानक ते जमिनीवर कोसळले. जमीनीवर कोसळले त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी आहेत. अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे.
अशोक माळी हे गेल्या चार- पाच वर्षापासून गरबा प्रशिक्षक म्हणून काम करतात. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते. यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेले होते. अशोक माळी यांच्यासोबत त्यांचा मुलगा भावेश देखील गेला होता. दोघे गरबा खेळताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
Web Title: Garba King collapsed on the spot while playing Dandiya and the game ended
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study