संगमनेरात २४ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, दोघांना अटक
Sangamner Crime: कारमधील दोघा संशयीतासह त्यांच्याकडील मोबाईल आणि कार असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात (Arrested).
संगमनेर: संगमनेरमध्ये 172 किलो गांजा सह तब्बल 24 लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून या गांजाप्रकरणी सखोल तपास करून याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
संगमनेर शहरानजीक कोल्हार- घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसानी ही कारवाई केली. एका ब्रिझा कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गाजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर जवळील नसीब वडापाव सेंटर जवळ थांबले होते. संशयास्पद ब्रिझा कार (एम. एच. 50 एल 9970) तेथे आली असता पोलिसानी कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस पथकाने कारची तपासणी केली असता त्यामध्ये त्याना 15 लाख 55 हजार 740 रुपये किमतीचा उग्र वास असलेला 172 किलो 80 ग्राम गांजा आढळून आला. त्यामुळे संशयितानी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बळापुढे त्याचे प्रयत्न फोल ठरले. पोलिसांनी कारमधील दोघा संशयीतासह त्यांच्याकडील मोबाईल.आणि कार असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर आरोपी संदीप लक्ष्मण भोसले (वय 35 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय 30 वर्ष रा, वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघा आरोपी विरोधात पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.
Web Title: Ganja worth Rs 24 lakh seized in Sangamner two arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App