अहमदनगर ब्रेकिंग! ४४ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक
Breaking News | Ahmednagar: दोन आरोपींना ताब्यात घेऊन ४४ लाख किमतीचा गांजा व वाहन जप्त. ( seized)
राहाता: राहाता पोलिसांनी शनिवारी सकाळी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन ४४ लाख किमतीचा गांजा व वाहन जप्त केले. या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी सकाळी पोलीस गस्त घालत असताना जुनी पंचायत समिती रोड लगत पोलिसांना विना क्रमांकाच्या टेम्पोचा संशय आल्याने त्यांनी चालकास गाडी थांबवण्यास सांगून त्याची विचारपूस केली असता गाडीतील दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला.
मालवाहतूक टेम्पो पोलिसांनी ठाण्यात आणला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात ७ ते ८ गोण्या आढळून आल्या. या गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा लपवल्याचे आढळून आले. यामध्ये एकूण ४०० ते ४५० किलो गांजा मिळून आला. या गांजाची बाजारामध्ये किंमत ४४ लाख ९७ हजार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपी सचिन रामदास पवार व राहुल विनायक आरणे दोघे राहणार राहाता, प्रदीप सरोदे अमोल यांचे पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, असे चौघेजण गाडीत जात असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन मोबाईल आढळून आले. आरोपीकडे असलेले मोबाईल जप्त केले असता त्यामध्ये काही लोकांशी संभाषण झाल्याचे दिसत आहे. या घटनेतील आरोपी सरोदे व अमोल फरार झाले आहे. गांजा व टेम्पो मिळून एकूण ५० लाख २७ हजार रुपयाचा किमतीचा माल जप करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली. पुढील तपास चमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोपानराव काकडे हे करत आहे या करवाईमध्ये उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस नाईक गडाख तसेच राहाता पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. या घटनेतील आरोपी सचिन पबत, राहुल आरणे, प्रदीप सरोदे व अमोल यांच्या विरोधात गंगीकारक औषधी द्रव्य च मनोव्यापारांबर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Ganja worth 44 lakhs seized, two arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study