अहमदनगर: घरासमोर पिकविला गांजा, एकावर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: गांजा पिकविणाऱ्या एका व्यक्तीवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल.
नेवासा : नेवासा बुद्रुक येथील गांजा पिकविणाऱ्या एका व्यक्तीवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या व्यक्तीला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी (दि. ४) सायंकाळी ४ वा. च्या सुमारास ही कारवाई झाली.
पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार नेवासा बुद्रुक येथील सत्तार शौकत इनामदार याने घरासमोरील जागेत गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाल्याने रविवारी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी कर्मचाऱ्यांसा घटनास्थळी धाव घेतली.
इनामदार याच्या घरासमोर पंचासमक्ष पाहणी केली असता ४ रे ५ फूट उंची असलेली गांजाची झाडे लावलेली आढळून आली पोलिसांनी ६ किलो वजनाची ६० हजार किमतीची गांजाची झाडे हस्तगत करून सत्तार इनामदारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेवासा न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावलं आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज अहिरे, कर्मचारी राठोड, हर्र धायतडक, आप्पासाहेब वैद्य आदींनी ही कारवाई केली.
Web Title: Ganja grown in front of the house, crime on one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study