Home औरंगाबाद विवाहितेस पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देत सामूहिकपणे अत्याचार

विवाहितेस पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देत सामूहिकपणे अत्याचार

Breaking News | Crime: एका विवाहित महिलेला ब्लॅकमेलिंग करून पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पाच जणांनी सामूहिकपणे अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gang rape of married women by threatening to kill their husbands and children

पैठण: पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका विवाहित महिलेला ब्लॅकमेलिंग करून पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पाच जणांनी सामूहिकपणे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी बिडकिन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बिडकीन पोलीस ठाण्यात आज (दि. १४) तक्रार दिली.

याबाबत मिळालेल्या  माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन येथील एका २९ वर्षीय महिलेला ब्लॅकमेलिंग व पाठलाग करून पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पाच जणांनी संगणमत करून दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी कृष्णापूर (ता. पैठण) येथील आरोपीच्या घरी अत्याचार केला. त्यानंतर दि.१० ऑगस्ट २०२३ रोजी पार्वती लॉजवर पुन्हा सामूहिक अत्याचार केला.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दीपक गरड, अरमान (दोघे रा. बिडकीन) व इतर ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि जनाबाई सांगळे करीत आहेत.

Web Title: Gang rape of married women by threatening to kill their husbands and children

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here