Home पुणे मुलांना ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर सामूहिक अत्याचार

मुलांना ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर सामूहिक अत्याचार

Pune Crime: मुलांना ठार मारण्याची धमकी देत एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना.

Gang rape of married couple threatening to kill children

पुणे: पुण्यातील स्वारगेट परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मुलांना ठार मारण्याची धमकी देत एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

मिळालेली माहिती अशी की,  पीडिता आणि आरोपी मूळचे राजस्थान येथील रहिवाशी आहेत. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने राजस्थानात जाऊन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात सोहेल सबीक खान (वय, 20), कालू आबन खान (वय, 50) आणि दिलदार खाजू खान (वय, 27) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त आले होते पुण्यात पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त पुण्यात आले होते आणि ते स्वारगेट येथील एका वसाहतीत भाड्याने राहत होते. दरम्यान, जून महिन्यात आरोपी सोहेल पीडिताच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास मुलांना जीवे मारू, अशी धमकी त्याने पीडिताला दिली. यानंतर आरोपी कालू आणि सोहेल यांनी देखील तिला धमकावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता आपल्या मूळ गावी निघून गेली. त्यावेळी तिसरा आरोपी दिलदारने फोनद्वारे पीडिताशी संपर्क साधला. तसेच या घटनेची पोलिसांना माहिती देऊ नको, अशी धमकी दिली.

हा सर्व प्रकार असहाय्य झाल्याने पीडित महिलेने राजस्थानला पोहचल्यानंतर तेथील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे वर्ग केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Gang rape of married couple threatening to kill children

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here