Home महाराष्ट्र गुंगीचं औषध पाजून तरुणीवर आळीपाळीने सामुहिक अत्याचार

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर आळीपाळीने सामुहिक अत्याचार

Breaking News | Mumbai Crime: गुंगीचे औषध टाकून 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना.

Gang rape of a young woman by taking Gungi medicine

मुंबई: पाण्यातून गुंगीचे औषध टाकून 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना  वांद्रेच्या निर्मलनगर परिसरात घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात  घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीला लिफ्ट देण्यच्या बहाण्याने अत्यचार करण्यात आले आहे. घरी सोडतो असे म्हटल्यानंतर पीडीत तरूणी तरुणांसोबत गेली.  लिफ्ट दिल्यानंतर तरुणांनी तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले. मात्र याच पिण्याच्या पाण्याने घात केला.  कारण  पाण्यात गुंगीच औषध टाकलं.  त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर अज्ञातस्थळी आळीपाळीने  बलात्कार केला.

पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यावेळी आरोपीने  तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.  घरी सोडल्यानंतर तरूणीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.  पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात या तरुणीवर अत्याचार  झाल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एका आरोपीला अटक तर  दुसरा आरोपी  फरार झाला आहे.   

Web Title: Gang rape of a young woman by taking Gungi medicine

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here