पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, सहा जणांना अटक
Gang rape: पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार नग्न फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी.
पुणे : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
ओम राजू तिंबोळे, जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना विशालनगर येथील लॉज, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी, तसेच औंध येथील कबुतराच्या रूममध्ये जुलै ते २३ डिसेबर २०२२ दरम्यान घडली. पोलिसांनी या सर्वांवर पोक्सोसह अनुसूचित जाती-जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून आपल्या मित्रांमध्ये प्रसारित केले.
त्यानंतर तिचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
२३ डिसेंबरला दुपारी तिला एके ठिकाणी बोलावून सहाजणांनी सामूहिक बलात्कार केला. या अत्याचाराचा तिला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार समोर आला तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
Web Title: The gang rape of a minor girl, six people arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App