गाडीवर बसवून नेलं अन्… तोंडात रेती टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
Breaking News | Amravati Crime: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) झाल्याची घटना.
अमरावती : अमरावतीमधून एक क्रूर अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या तोंडात आणि डोळ्यात रेती टाकून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पॉस्को, अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते. ही घटना 29 जूनला सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली. अक्षय प्रकाश खाडे, राजेश कोहळे, आकाश पिल्लारे आणि शिवाजी चौधरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. यातील दोघांनी मुलीवर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचारही केले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, मुलगी किराणा दुकानात निघालेली असताना शिवाजी चौधरीने तिला बोलवून घेतलं. त्याने तिला म्हटलं, की तुला तुझ्या आजीकडे सोडतो. यामुळे मुलगी त्याच्या दुचाकीवर बसली. मात्र, काही अंतर जाताच त्याने एका ठिकाणी गाडी थांबवत मुलीवर बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिच्या तोंडात आणि डोळ्यात रेती टाकली. इतकंच नाही तर चाकूने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
शिवाजीने यानंतर दुचाकीचा मालक राजेश कोहळे यालाही तिथे बोलावलं. राजेश तिथे आला आणि त्यानेही मुलीवर बलात्कार केला. काही वेळात आकाश आणि अक्षयही तिथे पोहोचले, मात्र त्यांनी याबाबत मौन बाळगलं. अखेर रात्री दहा वाजता आरोपींनी पीडितेला घरी सोडलं. यानंतर ती प्रचंड घाबरली होती. अखेर 5 जुलै रोजी तिने पालकांसह पोलीस ठाणं गाठून याबाबत तक्रार दाखल केली.
Web Title: Gang rape of a minor girl by putting sand in her mouth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study