कॉलनीतील सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन जवानांना अटक
Breaking News | Mumbai Crime: दोन जवानांनी सहकारी जवानाच्या १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना.
मुंबई: भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन जवानांनी सहकारी जवानाच्या १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पवई पोलिसांनी संशयित जवानांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेला एक आरोपी ३० तर दुसरा आरोपी २३ वर्षांचा आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षांची असून इयत्ता दहावीत शिक्षण घेते. आरोपी आणि पीडितेचे वडील भारतीय तटरक्षक दलात एकमेकांचे सहकारी आहेत. ते मुंबईतील पवई परिसरात असलेल्या एकाच कॉलनीत राहतात. तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव होता. त्यावेळी पीडितेच्या घरातील सर्व मंडळी आणि आरोपीची पत्नी बाहेर गेली होती.
पीडिता घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीची नियत फिरली. माझ्या पत्नीने तुला बोलावले आहे, असं सांगून आरोपीने तिला घरात बोलावले. पीडिता घरात येताच आरोपी आणि त्याच्या साथीदाराने पीडितेचे तोंड दाबून तिला बेडरूममध्ये नेले. तिथे दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर बलात्कार (Rape) केला.
पीडित मुलीने त्यांना विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे पीडिता तणावाखाली गेली. सुरुवातीला याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, आरोपी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याने अखेर आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला.
मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तटरक्षक दलाकडे याप्रकरणी तक्रार केली. यानंतर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. अखेर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.
Web Title: Gang rape of a colleague’s daughter in the colony Two jawans arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study