Gang Rape: शेतमजूर तरूणीवर सामूहिक बलात्कार, जंगलामध्ये घेऊन गेले अन…
Gang-rape: संत्रा तोड मजूर २२ वर्षीय तरुणीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.
अमरावती: एका २२ वर्षीय संत्रातोड मजुर तरूणीवर दोघांनी सामुहिक अत्याचार (abused) केला. ६ डिसेंबर रोजी रात्री १२ ते ४ दरम्यान ती धक्कादायक घटना घडली. मोर्शी तालुक्यातील दापोरीस्थित पाक नदी धरणासमोरील जंगलामध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी सुरदास भोजराज इडपाची (४०, दापोरी) व देवा मुन्ना उईके (३०, रा. हिवरखेड) या दोघांविरूध्द अपहरण, सामुहिक अत्याचार, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी सुरदास इडपाची व देवा मुन्ना उईके हे दोघे ६ डिसेंबर रोजी रात्री पिडित तरूणीच्या घरी आले. आम्ही हिला संत्रा तोडीच्या कामावर घेऊन जातो, अशी बतावणी त्यांनी तरूणीच्या आईकडे केली. तिच्या आईने परवानगी दिल्याने दोन्ही आरोपी तिला दुचाकीवर पाक नदी प्रकल्प धरण समोरील जंगलामध्ये घेऊन गेले. तेथे दोन्ही आरोपींनी तिच्यावर जबरीने अत्याचार केला.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
दुष्कृत्य केल्यानंतर घरी परत आणून देत असताना आरोपींनी तिला प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. तिला तिच्या घरासमोर आणताच दुचाकीवरून धक्का देण्यात आला. त्यामुळे पिडिताच्या हाताला व पायाला खरचटले. त्या धक्क्यातून सावरत ७ डिसेंबर रोजी दुपारी तिने मोर्शी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
Web Title: Gang-rape death threats on young farm worker woman
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App