Ahmednagar | दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शस्त्रासह जेरबंद
Ahmednagar | अहमदनगर | पाथर्डी: दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला तीन गावठी पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे व वस्तरा या शस्रांसह विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या विशेष पथकाने गजाआड (Arrested) केले आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. (Ahmednagar News)
गणेश बाबासाहेब केदार वय २४ रा. पाडळी ता. पाथर्डी, कालिदास दत्तात्रय टकले वय २८ रा. हरताळा ता. पाथर्डी, विकास अप्पासाहेब गिरी वय २२ रा. पाडळी ता. पाथर्डी (Pathardi) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाच जणाची टोळी शनिवारी सायंकाळी चार चाकीने शस्त्रसह चोपडा व मध्यप्रदेश भागात दरोडा साठी निघाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम पथकासह चोपडा भागात दाखल झाले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांना सोबत घेऊन बोरअंजटी ते वैजापूर रोडवरील तेल्या घाटात दरोड्याचा कट असल्याने या पथकाने या भागात गुप्त सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची चार चाकी आली तिला थांबण्याचा इशारा केला असता ही गाडी वेगाने पुढे निघून गेली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केल्यावर काही अंतरावर पाण्याच्या झर्याजवळ चार चाकी थांबवून त्यातील पाचही जण जंगलाच्या दिशेने पळत सुटले. पथकाने त्यांचा पाठलाग केला. तीन जण हाती आले. तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडील तीन गावठी पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे व वस्तरा, चार चाकी गाडी असा ६ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पळून गेलेले मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
Web Title: gang preparing to carry out a robbery was arrested with weapons