Home संगमनेर संगमनेरात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक, चार जण...

संगमनेरात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक, चार जण पसार

Breaking News | Sangamner Crime: हॉटेलसमोरील नाशिक-पुणे महामार्गावरील बोगद्यात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीचा पर्दाफाश.

Gang preparing for robbery busted in Sangamner, two arrested

संगमनेर : शहरालगत सावजी हॉटेलसमोरील नाशिक-पुणे महामार्गावरील बोगद्यात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीचा पर्दाफाश संगमनेर पोलिसांनी केला. बुधवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्याने कारवाई करत दोन जणांना अटक केली, तर चौघेजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या घटनेतील सहा जण संगमनेरमधील असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी पहाटे एक वाजता पोलिस पेट्रोलिंग करत असताना बोगद्यात काही व्यक्ती दबा धरून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या जवळ तलवार, कोयते, फायटरसारखी घातक शस्त्रे, लोखंडी पक्कड, मोबाईल आणि स्प्लेंडर दुचाकी आढळून आली.

महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोहन अनिल अभंग (२७, रा. देवाचा मळा) व सोनू ऊर्फ अर्थव संतोष दुधाने (१९, रा. देवाचा मळा) यांना अटक केली. दरम्यान, प्रेम वाल्हेकर, अजय विजय वाल्हेकर (दोघे रा. गुंजाळवाडी) व अश्फाक शेख (रा. अकोले नाका) हे चौघे फरार झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई सुभाष बाळू मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ४६६/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम ३१०(४), ३१०(५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची दुर्लक्ष वृत्ती यामुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Breaking news: Gang preparing for robbery busted in Sangamner, two arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here