युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या
Nashik Crime News : धारदार शस्त्राने २५ वार करत तरुणाची हत्या.
नाशिक: नाशिक येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाथर्डी येथे जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे. एका टोळक्याने तरूणावर हल्ला करत त्याच्यावर धारदार शस्त्राने २५ वार करत त्याची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नंदेश विजय साळवे (वय २०) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी येथील इंदिरानगर पोलीस ठण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. नंदेश हा काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात कोयते, चाकू, सुरे होते. या शस्त्राने त्यांनी नंदेशवर हल्ला केला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याला दवाखान्यात भरती केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांचा पंचनामा केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. नंदेशची हत्या ही जुन्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Gang attack on youth Killed with as many as 25 blows
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study