मित्रांनीच संपविले मित्राला; मृतदेह प्लास्टिक बॅरलमध्ये घालून पुरला
Pune Murder News: पुणे जिल्ह्यातील थरारक घटना; स्टीलच्या चिमट्याने डोक्यात, तोंडावर घातले घाव.
वेल्हे | पुणे : काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी विजय काळोखे याचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह रानवडी (ता. वेल्हे) येथे शेतजमिनीत पुरला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून हा खून सोन्या-चांदीच्या हव्यासापोटी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
याप्रकरणी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रय निवंगुणे, ओमकार नितीन निवंगुणे आणि पांडुरंग रामभाऊ निवंगुणे यांना ताब्यात घेतले आहे. मृत विजय काळोखे घरातून निघताना सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन गेला असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. वेल्हे पोलिसांनी त्यानुसार घटनेचा तपास सुरू केला. माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन निवंगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने संपूर्ण हा घटनाक्रम सांगितला.
मृतदेह प्लास्टिक बॅरलमध्ये घालून पुरला
■ विजय प्रफुल्ल काळोखे हा घरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन आला होता, ही माहिती त्यांना समजली. आरोपीने हव्यासापोटी संतोषनगर कात्रज येथे स्टीलच्या चिमट्याने काळोखे याच्या डोक्यात, तोंडावर मारून त्याचा खून केला.
■ यानंतर पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याचा मृतदेह प्लास्टिक बॅरलमध्ये टाकला. मृतदेह असलेला प्लास्टिकचा बॅरल उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून रानवडी (ता. वेल्हे) येथे आरोपी नितीन निवगुणे याच्या शेतात आरोपी विजय दत्तात्रय निवगुणे याच्या साहाय्याने खड्डयात पुरले, अशी माहिती त्याने दिली.
Web Title: Friends murder friends The body was buried in a plastic barrel
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App