धक्कादायक कारण! मित्राला गाडीवर बसवून धरणाजवळ नेलं अन् मग संपवलं
Pimpari Murder Case: अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराच्या मानेवर आणि चेहेऱ्यावर विळ्याने वार करून मृतदेह मुळशी धरणात फेकून दिल्याची घटना.
पिंपरी: पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराच्या मानेवर आणि चेहेऱ्यावर विळ्याने वार करून मृतदेह मुळशी धरणात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मुळशी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. २४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
किशोर प्रल्हाद पवार (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत पोलिसांनी अक्षय भास्कर खिल्लारे (वय २१) याला अटक केली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी अक्षय याने किशोरला माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला सोबत घेतलं आणि सुस गावातून गाडीवर घेऊन वारक या गावाजवळ आला. गावाजवळ असणाऱ्या मुळशी धरणाच्या पाण्याजवळ घेऊन आला. लघुशंका करण्याच्या निमित्ताने त्याने किशोर याच्या पाठीमागून त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात किशोरचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र, मृतदेह कुणाला सापडू नये म्हणून त्याचे हात पाय कपड्याने बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणात फेकून दिला होता.
किशोर बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलिसात दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास करत असताना पोलिसांना किशोर हा अक्षय सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
Web Title: friend on the car and took him near the dam and then Murder him
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App