धुलवडीची पार्टी बेतली! शेततळ्यात ढकलून देत मित्रानेच मित्राला संपवलं
Breaking News | Beed Crime: शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये वाद झाल्याने वाद शेततळ्यात ढकलून देत खून (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार.
बीड: धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये वाद झाल्याने वाद शेततळ्यात ढकलून देत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पवारवाडी येथे उघडकीस आला आहे. कुंडलिक भीमराव धुमाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांनी दुसऱ्या दिवशी पार्टी करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे पवारवाडी येथील काही मित्रांनी मिळून अशोक खामकर यांच्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते. दुपारी पार्टी करत असताना कुंडलिक भीमराव धुमाळ व संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्यात बोलता बोलता वाद झाला. यावेळी जवळच असलेल्या शेततळ्यात महेश मोरे याने कुंडलिकला तळ्यात ढकलून दिले. पाण्यात पडताच कुंडलीक घाबरला याचवेळी महेशने त्याच्या अंगावर उडी मारली. यामुळे पाण्यात खाली बुडून तोंडात व नाकात पाणी गेल्याने कुंडलिक याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान मित्रांनी अचानक पाण्यात बुडून कुंडलिकचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र कुंडलिकला पोहता येत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी बुडून मृत्यू होऊ शकत नाही, असा आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता कुंडलिक याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी महेश मोरे यास अटक करण्यात आली आहे.
Web Title: friend killed a friend by pushing him into the farm
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study