Home महाराष्ट्र मोदी सरकारची मोठी घोषणा: २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण

मोदी सरकारची मोठी घोषणा: २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण

Free Vaccination for all persons above 18 years 

नवी दिल्ली | Vaccination: गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठी महामारी आली आहे. या महामारी संकटाचा देश सामना करीत आहे. हे सांगत असतानाचा लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्रसरकारची असेल. २१ जून पासून १८ वर्षावरील सर्वाना केंद्रसरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल.

ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी सांगितले आहे.

Web Title: Free Vaccination for all persons above 18 years 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here