बाप झाला हैवान, चार वर्षाच्या चिमुरडीला चाकूचे चटके देत शारीरिक अत्याचार
Breaking News | Pune Crime: चार वर्षीय बालिकेवर बापाकडून अत्याचार.
पुणे: आज सगळीकडे पितृदिवस साजरा होत आहे. पण दिवसाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुणे येथून समोर आली आहे. फादर्स डे दिवशी पित्याने चिमुकलीला चाकूने चटके दिल्याची घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षीय बालिकेवर बापाकडून अत्याचार झाल्याच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुनील चौहान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना 5 ते 14 जून दरम्यान घडली आहे. चार वर्षाची चिमुकली शाळेत सतत रडत असे. शिक्षिकेला मुलीच्या हातावर चटके दिल्याचे वण दिसले. रोज शाळेत चिमुरडी रडत असल्याने शिक्षिकेने तिला प्रेमाने जवळ घेत कारण विचारले. त्यानंतर चिमुकलीने घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी या चिमुरडीचा सावत्र बाप होता. आई आणि सावत्र बाप हे दोघेही मजुरीचे काम करत होते.त्यामुळे सुरुवातीला आईने पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र सावत्र बाप चिमुकलीचा वारंवार पीडितेचा छळ करत होता. त्यामुळे आईनेच पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी लहान मुलीशी अश्लील वर्तन करत होता तसेच अनेक वेळा त्याने चाकू गरम करून तिला चटके सुद्धा दिलेत असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरुन गेली.या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून आजच्या दिवशी ही क्रूर घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: four-year-old girl was physically assaulted with a knife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study