कार, टेम्पो ट्रॅव्हल्सच्या अपघातात अकोले तालुक्यातील चार महिला ठार
Breaking News | Akole Accident: कार, टेम्पो ट्रॅव्हल्स बसची धडक, या अपघातात अकोले तालुक्यातील एकाच परिवारातील चार महिला ठार.
अकोले : एका वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी ते गावाला आले होते परतत असताना भीषण अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता कार व टेम्पो ट्रॅव्हल्स बसची जोराची धडक झाली. या अपघातात अकोले तालुक्यातील एकाच परिवारातील चार महिला ठार झाले. या घटनेमुळे तालुक्यातील कंळब, बदगी बेलापूर व लिंगदेव गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातात ब्रीझामधील भाग्यश्री, साहेबराव गायकर (वय १८, रा कळंब), कुसुम मारुती शिंगोटे (वय ५५ वर्षे, रा. बदगी बेलापूर), सविता साहेबराव गायकर (वय ३८ वर्षे रा. कळंब), सुनीता कारभारी हाडवळे (वय ५७ वर्षे, रा. लिंगदेव) या चौधी ठार झाल्या. साहील साहेबराव गायकर (वय २२ वर्षे, रा. कळंब), साहेबराव रामदास गायकर (वय ४२ वर्षे, रा. कळंब) यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात माळशेज घाटाजवळील पिंपळगावजोगा फाट्यावर घडला. अपघातात टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक व त्याचा सहायक दोघे जखमी झाले आहेत. पिंपळगाव जोगा फाटाचे जवळ नगर बाजूकडून कल्याण बाजूकडे जाणारी मारुती सुझुकी ब्रिझा (एमएच ४३ सीडी २९१३) व कल्याण बाजूकडून नगर बाजूकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस (एमएच ४७ बीएल ४२५१) यांचा अपघात झाला. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई राहात असलेले तालुक्यातील कळंब येथील साहेबराव रामदास गायकर हे पत्नी, दोन मुले व दोन मावशीसोबत घेऊन कल्याण मुंबईकडे जात होते. एका वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी ते गावाला आले होते. रविवारी मुंबईकडे परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला.
टेम्पो चालक धनंजय स्वपन दास (वय २६ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. प्रेमनगर, बंगूरनगर, गोरेगाव ईस्ट पो. मोतीलालनगर, मुंबई) व सहायक ससोदर सुमीदर दास (वय ४० वर्षे रा. प्रेमनगर, बंगूरनगर, गोरेगाव) हे दोघे जखमी झाले आहेत. टेम्पो ट्रॅव्हल्समधील इतर ४ ते ५ करकोळ जखमी झाले आहेत.
Web Title: Four women from Akole taluka killed in Tempo Travels accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study