Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरुणाचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग! चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar Accident: चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू.

Four-wheeler and two-wheeler collide head-on, youth dies in Accident

कर्जत : बारामती-अमरापूर राज्यमार्गावर करपडी फाट्याच्या पुढे चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश बाळासाहेब काळे (वय २५, रा. राशीन, ता. कर्जत), असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बाळासाहेब काळे (वय २५, रा. राशीन, ता. कर्जत), परबत भाकरे (वय २३, रा. देशमुखवाडी) व अरबाज अस्लम सय्यद (वय २४, रा. राशीन) हे तिघेही खेड येथे वेल्डिगचे काम करून राशीनकडे परतत असताना चारचाकी आणि दुचाकीची जोरादार धडक झाली. या अपघातात योगेश बाळासाहेब काळे, परबत भाकरे व अरबाज अस्लम सय्यद गंभीर जखमी झाले. या तिघांनाही तातडीने राशीनच्या महालक्ष्मी आयसीयू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, यातील योगेश काळे याचा मृत्यू झाला. तर परबत भाकरे व अरबाज अस्लम सय्यद हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखन्यात हलवण्यात आले. त्यांच्यावर डॉ. नितीन खरात, डॉ. युवराज शिंदे, डॉ. कृष्णकांत गावंडे व त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले.

चारचाकी वाहनास मोटारसायकलने ाडक एवढी जोरात होती की, मोटर सायकल चे इंजन सुद्धा तुटून त्यावरील तिघेही उडून दूरवर फेकले गेले, तर त्याच्या समवेत असलेले सागर परबत भाकरे (वय २३, रा. देशमुखवाडी) व अरबाज अस्लम सय्यद (वय २४, रा. राशीन) या दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही खेड येथे वेल्डिगचे काम करून राशीनकडे परतत असताना हा अपघात झाला.

Web Title: Four-wheeler and two-wheeler collide head-on, youth dies in Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here