Home जळगाव एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार, भीषण अपघात

एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार, भीषण अपघात

Breaking News | Jalgaon Accident: महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. दुर्घटनेत 2 जण जागीच ठार झाले.

Four people were thrown from a speeding bus 2 killed, terrible accident

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परीसरात भीषण अपघाताची घडली असून दुर्घटनेत 2 जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. येथे महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर, जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  या घटनेनंतर स्थानिकांसह आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही देखील घटनास्थळी भेट दिली.

महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

एसटी बसचा ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकी स्वारांसह 4 जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष)  अशी अपघातातील मृतांची नावे असून तर अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.  अधिक तपास सुरु आहे.

Breaking News: Four people were thrown from a speeding bus 2 killed, terrible accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here