संगमनेर शहरात विनाकारण फिरणाऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी चार जण बाधित
संगमनेर | Sangamner: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.जवळपास एक महिन्यापासून कडक निर्बंध सुरु आहेत. वैद्यकीय सेवा वगळता अत्यवश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याला परवानगी आहे. मात्र तरी रुग्णवाढ कायम आहे. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेक नागरिक काम नसताना फिरत असल्याचे आढळून आले आहे. आता अनावश्यक हिंडणाऱ्या नागरिकांना नियंत्रित आणण्यासाठी प्रशासनाने नवीन शक्कल लढविली आहे.
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्याची अँटीजेन चाचणी करून कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यांना शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्याचे आदेश रविवारी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
संगमनेर शहरात या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सकाळ असून पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्याना ताब्यात घेत बस स्थानकावरील कोविड तपासणी केंद्रावर आणून त्यांची चाचणी करण्यात आली. अवघ्या एक तासांत ९६ जणांची चाचणी करण्यात आली असून यामध्ये चार जण बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्या चौघांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
Web Title: Four people were infected on the first day in Sangamner