कोतूळ येथील हल्ला प्रकरणी चौघांना अटक, दोन जण पसार
Akole | Kotul News: नगरमधून चौघांना अटक (Arrested), दोघे पसार, याप्रकरणात मदत करणायांना जास्तीत जास्त शिक्षा होईल.
कोतूळ : कोतूळ येथील गोडे गटाने शेती व रस्ता वादातून तिघांवर नगरमधून अटक जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी अकोलेचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी चार आरोपी अटक केले, तर दोन आरोपी पसार झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी जीवघेण्या हल्ल्याची घटना कोतूळ येथे घडली. तहसीलदार ते विभागीय आयुक्त यांनी हा रस्ता मोकळा करण्याचा निकाल दिला असताना गोडे कुटुंबाने त्यात घर बांधण्यास सुरुवात केली होती.
बाळासाहेब आरोटे तसेच सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून पोलिस पंचनामा करण्यासाठी आले असता, पोलिसांसमोर हा हल्ला झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी चार आरोपींना दुपारी नगर शहरात अटक केली.
हल्ल्यातील आरोपी लक्ष्मण नामदेव गोडे, जितेंद्र लक्ष्मण गोडे व दोन महिलांना अटक करण्यात आली, तर भरत नामदेव गोडे व विठ्ठल नामदेव गोडे हे पसार झाले असून, पोलिस पथके त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
कोणताही शेती किंवा अन्य वाद न्यायिक पद्धतीने नागरिकांनी हाताळावा. कायदा हातात घेऊ नये. कोतूळ येथील गुन्ह्यातील आरोपींना व त्यांना मदत करणायांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, असा तपास होईल. हा तपास मी स्वतः हाती घेतला आहे. – मिथुन घुगे, पोलिस निरीक्षक, अकोले.
Web Title: Four people were arrested in connection with the attack in Kotul
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App